Tuesday, October 8, 2024

अजितदादांचा कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा विस्तार करण्यावर अधिक भर

- Advertisement -

एखाद काम हातात घेतल की ते पूर्ण करायच. त्यासाठी वेळेची चिंता अजिबात नाही. तर दुसरीकडे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या कामाचा फॉलोअप घ्यायचा. म्हणूनच अजितदादांना (ajit pawar) कामाचा माणूस म्हणून ओळखले जाते. कोल्हापुर हा तीन ते चार तालुक्यापुरताच मर्यादित पक्ष या टीकेतून बाहेर पडत राष्ट्रवादीचा जिल्हाभर विस्तार व्हावा यासाठी आता पक्षनेते अजित पवार यांनी रणनीती आखली आहे. संघटन बांधणी बरोबरच विधानसभा निवडणुकीतही अधिक आमदार निवडून यावेत अशी तयार चालू केली आहे.

जेंव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली तेंव्हा कोल्हापूर जिल्ह्यात दोन खासदार, पाच आमदार, तीन मंत्री अशी भरभक्कम स्थिती होती. पण पुढे विविध कारणामुळे पक्षाला उतरती कळा लागलेली सर्वानी पहिले आहे. कागल, चंदगड, राधानगरी भुदरगड येथेच मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या रूपाने पक्षाचे अस्तित्व पाहायला मिळाले. मागील टर्म मध्ये शिरोळ तालुक्यात पूर्वी राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यामुळे पक्ष स्थिती मजबूत होती. विधानसभा निवडणुक अपक्ष निवडून येत त्यांनी शिवसेनेसोबत गेले. त्यामुळे शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगले, पन्हाळा, कोल्हापूर उत्तर आणि दक्षिण, करवीर येथे पक्षाचे अस्तित्व अगदी कमी राहिले. राष्ट्रवादी फुटीनंतर आता अजित पवार ajit pawar यांनी कंबर कसली आहे. मागील वर्षी पन्हाळा तालुक्यात अजित पवार यांची जाहीर सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी जिल्हाभर पक्ष वाढण्याची गरज व्यक्त केली होती.

उद्धव ठाकरे मोदींना संपर्क करण्याच्या प्रयत्नात ; भाजप सोबत पुन्हा मैत्री करणार ?

बाबासाहेब पाटलांकडे विशेष जबाबदारी

गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी मध्ये पक्षात्मक काम कमी प्रमाणात झालेल आहे. आता जिल्हा बँकेतील संचालक पन्हाळा तालुक्यातील बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्याकडे जबाबदारी सोपवली असून त्यांनी पक्ष बांधणीला नेटकी सुरुवात केली आहे. जिल्हाभर पक्षाबंधणीचे नेटके नियोजन केले आहे. विशेष म्हणजे हेच ते बाबासाहेब पाटील ज्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. या निवडणुकीत त्यांनी स्वत:ला सिद्ध करून दाखवलेच शिवाय त्यावेळी विरोधीपक्षनेते अजितपवार यांना गावात आणून जंगी सभा घेऊन मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. त्याच सभेत अजितपवार यांनी कोरेंच्या वर टीकाही केलेली.

आता महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार ajit pawar यांचे गेल्या महिन्याभरात कोल्हापूर, कागल, चंदगड या भागात त्यांचे दौरे झाले. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते पवार, मुश्रीफ यांनी पक्ष कमकुवत असलेल्या जिल्ह्याच्या भागात अधिक लक्ष घालण्याची गरज व्यक्त करताना दिसत आहेत. चंदगड येथे अजित पवार यांनी नूतन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्याकडून पक्ष बांधणीचा आढावा घेत असता पाटील यांनी जेमतेम दहा दिवसाच्या कालावधीत बहुतांशी तालुक्यात संघटनात्मक बैठका घेऊन कार्यकारिणी जाहीर करण्याची तयारी केली असल्याचे सांगितले. जिल्ह्यात अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसची समतोल बांधणी, कमकुवत भागाकडे अधिक लक्ष, कार्यकर्त्यांशी संवाद यावर भर दिला आहे. नेते हसन मुश्रीफ यांच्या समवेत सर्व विधानसभा मतदारसंघांचा दौरा करण्याचे नियोजन आहे. ज्या तालुक्यांमध्ये बैठका घेतल्या तेथे चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हा बँकेत पणन (मार्केटिंग) मतदार संघातून निवडून आल्याने ज्या तालुक्यात पक्षाची बैठक होते तेथे स्थानिक पणन संस्थांचीही मदत मिळत आहे. पक्षाची वाढ हळूहळू पण दमदारपणे होत आहे, असा दावा बाबासाहेब पाटील करताना दिसत आहेत.

मुश्रिफांना संधी…

मागील काही वर्षे कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे संघटनात्मक काम झालेले नाही. कार्यकर्त्यांना बळ मिळत नव्हते. आता तर राष्ट्रवादी काँग्रेसची विभागणी झाली आहे. जिल्ह्यात शरद पवार यांचा गटाकडे पक्षातील वरिष्ठांचा अधिकतम समावेश आहे. तुलनेने अजितदादा गटाला युवा वर्ग तसेच सत्तेधारी नेते मिळाली आहेत. पालकमंत्री पद, निधीचा खळाळता ओघ, कामांना मिळालेली गती अशा अनेक गोष्टी जुळून आल्याने मुश्रीफ यांनी संघटन बळकटीकरणाकडॆ आता लक्ष दिले आहे. गडहिंग्लज येथील दिवंगत आमदार श्रीपतराव शिंदे गटातील नगरसेवक गळाला लावून पहिले पाऊल टाकले आहे. कोल्हापूर- इचलकरंजी या महापालिके क्षेत्रात जोर वाढवला जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles