सरकारने राजकारण थांबवून नियोजनावर भर द्यावा – प्रविण दरेकर

Live Janmat

राज्याकडे सगळ्यांचं लसीकरण करण्याची क्षमता आहे पण पुरेशा लशीच नसल्याने 1 मे पासून 18 वर्षांवरील सगळ्यांचं लसीकरण शक्य होणार नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलंय. यावर राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

एकीकडे मोफत लस जाहीर करायची, दुसरीकडे लस अपुरी आहे असं सांगायचं,हे चुकीचे ठरेल. निश्चित वेळेत लसीकरण झालं नाही, तर त्यादरम्यान ज्या संकटाला सामोरं जावं लागेल, तेही आपल्याला परवडणारं नाही. जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून घेणं. यामध्ये राजकारण न करता, केंद्र सरकारशी वाद न करता समन्वय ठेवणं, खासगी पातळीवर जास्तीत जास्त लस उपलब्ध करून घेणं आणि १ मेपासूनच उत्तम लसीकरण करण्याची गरज आहे.

कारण ६ महिने हा खूप मोठा कालावधी आहे. त्यामुळे युद्धपातळीवर लस उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असं दरेकर म्हणाले. राज्य सरकारच्या निर्णयानंतर दरेकरांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here