Thursday, November 21, 2024

JEE Main 2021 परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

- Advertisement -

जेईई मेन परीक्षेच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील परीक्षांबाबत परीक्षार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झालेला होता. अखेर आज केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक याबाबतची भूमिका स्पष्ट करून, हा संभ्रम दूर केला. शिक्षणमंत्र्यांनी परीक्षेच्या तारखांची घोषणा करत सांगितले की, जेईई मेनची तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा २० जुलै पासून २५ जुलै पर्यंत होईल. तर, जेईई मेन चौथ्या टप्प्यातील परीक्षा जी मे महिन्यात होणार होती, ती २७ जुलै पासून २ ऑगस्ट २०२१ पर्यंत होईल.

ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या आणि दुसरे टप्प्यात परीक्षेसाठी अर्ज न करु शकणाऱ्यांना तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात अर्ज करता येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) ही परीक्षा आयोजित केली जाते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दुसरी लाटेचा धोका लक्षात घेऊन JEE Main परीक्षेचा तिसरा आणि चौथा टप्पा स्थगित करण्यात आला होता. आता या निर्णयाने या परीक्षेची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.

अर्ज प्रक्रिया सुरू

एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करता आले नाही त्यांना 6 जुलै ते 8 जुलै 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. चौथ्या टप्प्यासाठी 9 जुलै ते 12 जुलै 2021 पर्यंत अर्ज करता येणार आहे. जेईई मेन परीक्षा 4 वेळा आयोजित केली जाणार आहे. यापैकी ज्या परीक्षेचा निकाल चांगला असेल तो निकाल गृहित धरला जाईल. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलायचे त्यांना 6 ते 8 जुलै दरम्यान लॉग इन करता येणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles