Kolhapur LokSabha| २०२४ ची निवडणूक प्रतिष्ठेची;उमेदवारीवरून रस्सीखेच

- Advertisement -

नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध राजकारण करणारा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याला ओळखले जाते. २०१४ ला देशात मोदी लाट असतानाही तेंव्हाचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडीक यांना कोल्हापूरकरांनी निवडून दिले होते. तर राज्यात महाविकास आघाडीचा पहिला प्रयोगही कोल्हापूरतच झाला. सध्या राजकारणात मोठे बदल झाल्यामुळे सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्याचा परिणाम हा आगामी कोल्हापूर लोकसभेवर (Kolhapur LokSabha) होणार आहे. त्याचाच संक्षिप्त आढावा आम्ही घेत आहोत.

Kolhapur LokSabha |कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा राजकीयदृष्ट्या प्रमुख मानला जातो. कारण, कोल्हापूरच्या राजकारणात जी समीकरणे जुळवली जातात ती महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास येताना दिसतात. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या १५ निवडणुका झाल्या आहेत. १९६२ सालच्या पहिल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे विश्वनाथ पाटील निवडूण आले होते. १९७७ मध्ये चुरशीची निवडणुक झाली होती यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे दाजीबा बळवंतराव देसाई हे अवघ्या १६५ मतांनी निवडून आले. या नंतर मात्र १९८० ते १९९८ पर्यंत झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून उदयसिंगराव नानासाहेब गायकवाड तब्बल पाच वेळा खासदार राहिले होते. १९९८ ते २०१४ पर्यंत सदाशिवराव मंडलिक खासदार राहिले होते. त्यांचा प्रवास कॉंग्रेस ,राष्ट्रवादी आणि अपक्ष असा होता. एकंदरीत स्थापनेपासून हा लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. पण मंडलिकांच्या काळात या ठिकाणचे लोक पक्षापेक्षा व्यक्ति केंद्रीत झालेले दिसतात.

महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा मोठा राजकीय भूकंप होणार? |Girish Mahajan

देशाच्या राजकारणामध्ये 2014 ची निवडणूक ही ऐतिहासिक झाली होती यावेळी संपूर्ण भारतात नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही कोल्हापुरात मात्र वेगळे चित्र दिसून आले. कारण यावेळी कोल्हापुरात राष्ट्रवादीकडून रिंगणात असणारे धनंजय महाडिक हे तब्बल 33259 मतांनी निवडूण आले होते. त्यांनी शिवसेना पक्षातील संजय मंडलिक यांचा पराभव केला होता. २०१९ ला संजय मंडलिक हे कोल्हापूर लोकसभा Kolhapur LokSabha मतदारसंघाचे खासदार झाले. पण सध्या शिवसेना फुटी नंतर संजय मंडलिक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत महायुतीत एकत्र आहेत. 

कोल्हापूर लोकसभेत कोणाची ताकत जास्त | Kolhapur LokSabha

कोल्हापूर लोकसभा Kolhapur LokSabha मतदारसंघात सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात. कर्नाटक राज्यालगत लागुन असलेले चंदगड व कागल विधानसभा राष्ट्रवादीकडे आहेत. सध्या येथील दोन्ही आमदार अजित पवारांसोबत महायुतीत आहेत तर कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर हे विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. राहिलेला राधानगरी मतदारसंघ शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या सोबत आहे.

सध्या कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीत नेहमी महत्वाचा रोल प्ले करणारे कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील (satej patil) यांची साथ राष्ट्रवादीचे (अजितपवार गट) नेते हसन मुश्रीफ यांनी सोडली आहे. त्यामुळे ही निवडणुक आता चुरशीची होणार आहे.

sambhaji raje | संभाजीराजेंकडून लोकसभा निवडणुक लढविण्याचे संकेत

‘या’ मतदारसंघातून स्वाभिमानी संघटना लढविणार लाेकसभेच्या सहा जागा | Raju shetti

कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपकडूनही दावा सांगितला जाणार

यावेळी नरेंद मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प भाजपने केला आहे. त्यासाठी गेली वर्षभरापासून भाजपा निवडणुकीच्या मूड मध्ये आहे. राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडल्यामुळे २०२४ च्या लोकसभेकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्या कोल्हापुरात विद्यमान खासदार संजय मंडलिक हे एकनाथ शिंदे गटाचे आहेत. भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजितपवार गट) हे एकत्र निवडणूक लढविणार असल्याने विद्यमान जागा या त्याच पक्षाला सोडणार आहेत. पण लोकांचे जनमत पाहून काही ठिकाणी फेरबदल निश्चित करण्यात येणार असल्याचेही भाजपच्या नेत्यानी सांगितले आहे.

धनंजय महाडीक (Dhananjay mahadik) यांना भाजपने राज्यसभेवर घेऊन खासदार केले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्तेना मोठ पाठबळ मिळाले आहे. कोल्हापूर जिल्हा आता भाजपमय होत असल्याचे दिसत आहे. अनेक मोठे नेते भाजपमध्ये येणार असल्याचेही म्हंटले जात आहे. हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवून भाजपने कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारीच त्यांच्यावर टाकली आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा आता सोपी झाली आहे असच एकंदरीत चित्र आहे. पक्षाने आदेश दिला तर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे धनंजय महाडीक यांनी सांगितले आहे. तर सध्याच्या स्थितीनुसार विद्यमान खासदार हे शिंदे गटाचे असून नियमाप्रमाणे त्यांना जागा सोडावी लागणार आहे. पण जर भाजप आणि शिंदे गट, अजितदादा गट एकत्र बसून चर्चा करू आणि लोकसभेला जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिलेली. कोल्हापूरची सध्या स्थिती पाहता कोल्हापूर जिल्ह्यातील एक लोकसभा कमळ या चिन्हावर लढवली जाऊ शकते, तशी शक्यताही चंद्रकांतदादांनी वर्तवली आहे. 

१ वर्षापासूनच भाजपची तयारी; चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष लक्ष

या मतदार संघात गेली एका वर्षापासून भाजप तयारी करत असल्याचे दिसत आहेत. प्रत्येक महिन्यात आढावा बैठक घेवून बूथवर काम चालू आहे. पक्षाने कोल्हापूर लोकसभेची जबाबदारी खासदार धनंजय महाडीक यांच्याकडे सोपवली आहे. तसेच भारतीय जनता पार्टी कडून प्रभारी म्हणून साताऱ्याचे भारत पाटील यांची नियुक्ती केली आहे. तर समन्वयक म्हणून राहुल चिकोडे हे जिल्हाभर फिरून संघटनात्मक बांधणी करत आहेत. या मतदार संघातील प्रत्येक गोष्टीवर चंद्रकांतदादा पाटील हे लक्ष ठेवून असल्याचे दिसते. तर मागील काही महिन्यांत केंद्रीय कॅबिनेट मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही दौरे केले आहेत.

धनंजय महाडीक, संजय मंडलिक, हसन मुश्रीफ, समरजितराजे घाटगे या लोकप्रतिनिधीची नावे लोकसभेसाठी चर्चेत आहेत. सध्याचे वातावरण पाहता भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी (अजितपवार गट) हे एकत्र असल्याने भाजपसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा निवडून येण्यासाठी सोयीस्कर झाला आहे. त्यामुळे या जागेवर भाजपा निश्चित दावा करेल अस संकेत आहेत. उमेदवार कोणीही असो पण चिन्ह मात्र कमळच असेल, असेच चित्र सध्या दिसत आहे.

महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

२०१९ ला कोल्हापूर लोकसभेत शिवसेनेचा खासदार होते पण सध्या ते शिंदे गटात आहे. सतेज पाटील यांनी हा मतदारसंघ कॉँग्रेसचा असल्याचा दावा करत २०२४ ला सरप्राइज उमेदवार असल्याचे सांगितले आहे. कॉँग्रेसचे नेते पी.एन. पाटील, बाजीराव खाडे, छत्रपती शाहू महाराज यांची नावे सध्या चर्चेत आहेत. तर दुसरीकडे चेतन नरके हेही निवडूक लढविणार आहेत. शिवसेनतून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आता जागा वाटपावरून आघाडीत कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळेल हे येणारी वेळच सांगेल. कोल्हापूर लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles