मुलायमसिंह यादव यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. १०:- समाजवादी पक्षाचे संस्थापक, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव(Mulayam Singh Yadav) यांच्या निधनाने देशाच्या राजकारण, समाजकारणातील एक धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशा शब्दांत शोक व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘मुलायमसिंह यांची राजकीय कारकीर्द संघर्षशील आणि वैशिष्ट्यपूर्ण राहिली.  पक्षाची स्थापना, संघटन बांधणी ते देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांनी आपला ठसा उमटवला. देशाच्या राजकारणात त्यांनी धुरंधर आणि मुत्सद्दी नेतृत्व म्हणून ओळख मिळवली. त्यांचे देशाच्या समाजकारण, राजकारणातील योगदान सदैव स्मरणात ठेवले जाईल. ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव(Mulayam Singh Yadav) यांना भावपूर्ण श्रद्धांजली’ असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here