Friday, September 13, 2024

Oscar 2021| Chloe Zhao यांना नोमॅडलँडसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा ऑस्कर

- Advertisement -

नोमॅडलँड चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन आणि अभिनेत्री या तीन मुख्य पुरस्कारांसह सोहळ्यात बाजी मारली.

अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस इथे डॉल्बी थिएटर आणि युनियन स्टेशन या दोन ठिकाणी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 2001 पासून डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्करचं आयोजन झालं आहे.

ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हा पुरस्कार क्लोई चाओ यांनी पटकावला आहे. ऑस्कर पुरस्कारांच्या 93 वर्षांच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पुरस्कार पटकावणाऱ्या चाओ केवळ दुसऱ्याच महिला दिग्दर्शक आहेत.

‘नोमॅडलँड’ या सिनेमाने 2021 च्या सर्वोत्कृष्ट पुरस्कारावर नाव कोरलं आहे. नोकरी गेल्यानंतर घराबाहेर पडून फिरायला निघालेल्या एका महिलेची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिने या सिनेमात या महिलेची मुख्य भूमिका साकारली आहे. या सिनेमाला  सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री,  सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका अशा एकूण सहा श्रेणीत नामांकन मिळालं आहे. 

लॉस अँजेलसमधील युनियन स्टेशन आणि डॉल्बी थिएटर या दोन स्थळांवर ऑस्कर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. 2001 पासून डॉल्बी थिएटर हे ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी निश्चित झालेले स्थळ आहे.  यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘द प्रॉमिसिंग यंग वुमन’,  ‘द फादर’, ‘नोमेडलँड’, ‘साऊंड ऑफ मेटल’ ‘जुडास अ‍ॅण्ड द ब्लॅक मसीहा’ या सिनेमांना वेगवेगळ्या श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी Email Subscribe करा

ऑस्कर विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

च्लोए झाओ (Chloe Zhao) चित्रपट : नोमॅडलँड

सर्वोत्कृष्ट अभिनेता

अँथनी हॉपकिन्स (Anthony Hopkins) चित्रपट : मँक

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

फ्रान्सेस मॅकडॉर्मंड (Frances McDormand) चित्रपट : नोमॅडलँड

सर्वोत्कृष्ट चित्रपट

नोमॅडलँड

सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर

सोल (Soul)

सर्वोत्कृष्ट मूळ गाणे

फाईट फॉर यू – जुडास अँड द ब्लॅक मसिहा

मानवतावादी पुरस्कार (Humanitarian Award)

टायलर पेरी

सर्वोत्कृष्ट संकलन

साऊंड ऑफ मेटल

सर्वोत्कृष्ट छायाचित्रण

मँक

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन

मँक

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री

यून यू-जंग (मिनारी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता

डॅनियल कलूया (जुडास अँड द ब्लॅक मसिहा)

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स

टेनेट (Tenet)

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री – फीचर

माय ऑक्टोपस टीचर

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री – शॉर्ट सब्जेक्ट

कोलेट (Colette)

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म

सोल (Soul)

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म

इफ एनिथिंग हॅपन्स आय लव्ह यू (If anything happens i love you)

सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म

टू डिस्टंट स्ट्रेंजर्स (two distant strangers)

सर्वोत्कृष्ट ध्वनी

साऊंड ऑफ मेटल (Sound Of metal)

सर्वोत्कृष्ट वेशभूषा

मा रेनीज ब्लॅक बॉटम

सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा (मेकअप- हेअर डिझाईन)

मा रेनीज ब्लॅक बॉटम

सर्वोत्कृष्ट इंटरनेशनल फीचर फिल्म

अनदर राऊंड

सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा (अडाप्टेड स्क्रीनप्ले)

द फादर

सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा (ओरिजनल स्क्रीनप्ले)

प्रॉमिसिंग यंग वुमन

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles