पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आज महाविकास आघाडीचा गर्व फोडण्यात आला. मुंबईत बसून देवेंद्र फडणवीस यांनी योग्य नियोजन लावले. राष्ट्रवादी नेते त्यांचा उमेदवार 50 ते 60 हजार मतांनी निवडून येणार असे सांगत होते. पण मतदारांनी त्यांना दाखवून दिले. अजित पवार यांना गर्व झाला होता. त्यांची डगेगिरी भाषा होती. तो गर्व मोडून काढला,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit Pawar) यांना गर्व झाला होता. त्यांची डगेगिरी भाषा होती. तो गर्व मोडून काढला,” अशी तिखट प्रतिक्रिया भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिली.
हे वाचलात का ?
- ‘पीओपी’ मूर्तीसंदर्भात समिती स्थापन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- ॲग्रीस्टॅक योजना – शेतीतील डिजिटल क्रांती
- लाडकी बहीण योजना: महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी! ८ मार्च रोजी डबल पेमेंट –तुमचे नाव त्वरित तपासा!
- India Clinches Champions Trophy Final Spot with a Thrilling 4-Wicket Victory Over Australia
- Anveshi Jain | Top Five Web Series Must Watch Online
तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजपच्या राजकारणाविषयी भाष्य केले. त्यांनी यापुढेसुद्धा भाजपची विजयी घोडदौड कायम राहील असा दावा केला. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची गरज आहेत, असेसुद्धा वक्तव्य त्यांनी केले. यावेळी करेक्ट कार्यक्रम पंढरपूर मध्ये करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनतर पुढचा करेक्ट कार्यक्रम करतील. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची गरज आहेत. या मतदारसंघाने तसं दाखवून दिलं आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी Email Subscribe करा
महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur mangalwedha result) भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे (Samadhan Autade win) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके (Bhagirath Bhalke ncp) यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली.