Thursday, April 18, 2024

Rajaram Election 2023|दम असेल तर बिंदू चौकात या – अमल महाडिक

- Advertisement -

वडणगे : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आणि आरोप- प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले. माजी आमदार महादेवराव महाडिक यांची गेली २८ वर्षे सलग सत्ता राहिली असून यावेळीही त्यांचे पारडे जड मानले जाते. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असलेल्या गटाला आवाहन आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिले आहे. पाटील गटाकडून सातत्याने टीका होत असताना महाडिक गटाकडून उपस्थित केलेल्या कोणत्याच प्रश्नाला अद्याप उत्तर देऊ शकले नाहीत. Rajaram Election 2023 Rajaram karkhana | चंद्रदीप नरकेंच मौन ; बंटी पाटीलांची डोकेदुखी ?

वडणगे येथून सत्ताधारी महाडिक गटाच्या प्रचाराचा सुभारंभ आज पार पडला. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, खा. धनंजय महाडिक, अमल महाडिक, तानाजी पाटील, पवार आदींनी विरोधी गटाचा खरपूस समाचार घेतला, यावेळी बोलताना अमल महाडिक म्हणाले, “आम्ही उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नांची उत्तरे बंटी पाटील देऊ शकले नाहीत, त्यांच्यात जर दम असेल तर त्यांनी आज संध्याकाळी बिंदू चौकात यावे, मी राजाराम कारखान्यावर बोलतो, तुम्ही डी. वाय. पाटीलवर बोला.” या आवाहनाला सतेज उर्फ बंटी पाटील कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औचित्याचे ठरणार असून याकडे संभासदांच्या सोबत सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या आवाहनाचे समाजमाध्यमांवर पडसाद उमटत असून यामुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळले जाणार हे मात्र नक्की ! Rajaram Election 2023

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles