Friday, November 1, 2024

Rajaram Karkhana | गगनबावडा कुणाची जहागीर नाही – धनंजय महाडिक

- Advertisement -

गगनबावडा तालुका हा सतेज पाटील यांच्यासाठी बालेकिल्ला राहिला आहे. आजवर जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत गगनबावडा तालुक्याने सतेज पाटील यांना साथ दिली आहे. डॉक्टर डी वाय पाटील कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यावर असणारी पकड हे यामागचं प्रमुख कारण आहे. राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सतेज पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर महाडिक कुटुंबीयांनी प्रथमच सप्तगंगा प्रकरण लावून धरले आहे. त्यातच पूर्वीच्या गगनबावडा पन्हाळा या मतदार संघाचे आमदार व जनसुराज्य नेते विनय कोरे यांनी बंटी पाटील यांच्यावर शब्द न पाळण्याची टीका करत महाडिक यांना पाठिंबा दिला आहे. आमदार कोरे यांचा जुना गट या भागात आजही सक्रिय आहे. स्थानिक निवडणुका असो वा जिल्ह्यातील निवडणुका कोरे साहेबांचा आदेश आल्याशिवाय येथील प्रमुख मंडळी निवडणुकीचा झेंडा हातात घेत नाहीत. कोरे यांनी देखील हे ऋणानुबंध आजवर जपले आहेत. महाडिक गटास पाठींबा दिल्यानंतर सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी कोरे यांच्यावर अर्वाच्य भाषेत टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे देखील सावकर समर्थक नाराज आहेत. आजच्या सभेला मांडूकली, असंडोली या भागातील सावकर समर्थक सभासद सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरे यांनी स्वतः संपर्क करत जुन्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा आदेश दिला आहे. Rajaram Karkhana

राजारामच्या निवडणूकीत महाडिक यांनी डॉ. डी वाय पाटील कारखान्याचे 5629 सभासद एका रात्रीत गेले कुठे? असा प्रश्न विचारून सतेज पाटील यांना अडचणीत आणले आहे. डी वाय पाटील कारखान्याबद्दल केलेल्या आरोपांना सतेज पाटील यांनी उत्तर न दिल्याने यामध्ये तथ्य आहे असा समज सभासदांचा झाला आहे. त्यातच साळवण येथे खासदार धनंजय महाडिक यांनी घेतलेल्या प्रचार सभेला गगनबावडा तालुक्यातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक ज्येष्ठ सभासदांनी सप्तगंगा प्रकरणाचे गाऱ्हाणे खासदार महाडिक यांच्यासमोर मांडले.

गगनबावडा तालुका कुणाची जहागीर नाही, या ठिकाणची जनता स्वाभिमानी आहे. आजही सतेज पाटील यांच्या बद्दल जनतेच्या मनात खदखद आहे. डी वाय कारखान्याकडून टनेजची साखर देखील मिळत नाही. वजन काटा दोन ते तीन टनाने फरक आहे. तोडणी झालेला ऊस दोन दोन दिवस गाळपासाठी घेतला जात नाही याबद्दलची वस्तुस्थिती खासदार महाडिक यांच्या समोर मांडली. तसेच मागील काही दिवसापासून गगनबावड्यातील पाटील गटातील लोक महाडिक यांच्या संपर्कात असल्याचे समजते. चेअरमन विश्वराज महाडीक यांची गगनबावड्यातील जी एस कांबळे यांच्यासह काही प्रमुख नेत्यानी भेट घेतली होती. तसेच राजारामच्या निवडणूकीत आमदार कोरे हे महाडिक यांच्या सोबत असल्याने गगनबावड्यात तुल्यबळ मताधिक्य मिळवल्यास नवल वाटण्याचे कारण नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles