Wednesday, May 22, 2024

Rajaram SakharKarkhana |राजाराम कारखान्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

- Advertisement -

गेली काही दिवस राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राजाराम कारखान्याची (Rajaram SakharKarkhana) निवडणूक अवघ्या काही तासांवर आलेली आहे. संस्था गटातून सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक रिंगणात आहेत. संस्था गटातील 129 तर उत्पादक गटातील 13 हजार 409 असे 13 हजार 538 सभासद मतदानासाठी पात्र आहेत.

आज जोरदार शक्तिप्रदर्शनसह विरोधकांची सभा कसबा बावड्यातील मंडईत होणार आहे. दुसरीकडे सत्ताधारी महाडिक गटाची पुलाची शिरोलीत होणार आहे. त्यामुळे शेवटच्या प्रचार सभेत दोन्हीकडून काय आरोप केले जातात? याकडेही आता लक्ष लागले आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या सक्रिय सहभागाने राजारामची पाटील गटाला अपेक्षित असणारी निवडणूक अधिक अवघड बनून गेली आहे. एकीकडे महादेवराव महाडिक यांना मानणारा गट अन् महाडिक कुटुंबीयांची ताकद तर दुसरीकडे बंटी पाटील व कुटुंबीय यांना मानणारा गट अशी पारंपरिक निवडणूक बनली असल्याने महाडिक गटाने डी. वाय. पाटील कारखान्यावर आघाडी उघडली. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली असून प्रत्यक्ष सभासद यांच्यावर याचा काय परिणाम होतो? सभासद कोणाला कौल देतात? हे येत्या २३ तारखेला मतदानानंतर प्रत्यक्ष मतमोजणी झाल्यावर चित्र स्पष्ट होईल. अत्यंत प्रतिष्ठेची बनलेल्या राजाराम सहकारी साखर (Rajaram SakharKarkhana) कारखान्याच्या निवडणुकीचा परिणाम येणाऱ्या सर्वच निवडणुकांवर पडेल यात मुळीच शंका नाही.‘या’ निर्णयाने सतेज पाटील यांची राजकीय प्रतिमा डागाळली..? | rajaram karkhana kolhapur

आज संध्याकाळी 10 वाजता प्रचार थांबणार आहे. त्यामुळे आता पडद्यामागून हालचालींना वेग येणार आहे. दोन्ही गटाकडून केलेल्या आरोपांनी जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कारखान्यासाठी रविवारी 23 एप्रिलला मतदान होणार आहे. मतमोजणी मंगळवारी 25 एप्रिलला होईल. Rajaram SakharKarkhana

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles