मराठा आरक्षणाप्रश्नी संभाजीराजे घेणार आज राज्याचे विरोधी पक्षनेत्यांसोबत बैठक

0 0

- Advertisement -

संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात फिरुन मराठा आरक्षणाचे जाणकार, अभ्यासक आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. गुरुवारी सकाळीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट घेतली. त्यानंतर दुपारी ते मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर जात आहेत. खासदार संभाजी राजे छत्रपती आज सुद्धा राजकीय नेत्यांना भेटून मराठा आरक्षणा (Maratha Reservation) ला समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज संभाजीराजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही ते भेट घेणार आहेत.  

“गेल्या तीन-चार दिवसांपासून मी राज्यभरात फिरून मराठा समाजाच्या भावना जाणून घेत आहे. शरद पवार यांना भेटलो तेव्हा मराठा समाज किती अस्वस्थ आणि दु:खी आहे, हे मी त्यांच्या कानावर घातले. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी तुम्ही पुढाकार घेणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे या सगळ्या नेत्यांनीही एकत्र आले पाहिजे. शरद पवार यांनी या सगळ्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेन. त्यानंतर शुक्रवारी रात्री आठ वाजता मी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन माझी भूमिका जाहीर करेन, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.”

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज दुपारी 12 च्या सुमारास राज्याचे विरोधी पक्षनेत्यांसोबत बैठक होईल आणि त्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होईल. त्यानंतर शुक्रवारी रात्री आठ वाजता मी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन माझी भूमिका जाहीर करेन, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.