आज पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळा संभाजी ब्रिगेड यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. Shivrajyabhishek Din
यावेळी शरद पवार यांनी जनतेला संबोधन केलं. याप्रसंगी बोलताना शरद पवार म्हणाले की, शिवाजी महाराजांनी कष्टाने त्यागाने राज्य मिळवलं होत. शिवाजी महाराजांना जो काही आदर्श असेल तो आपण कृतीत आणण्याचा प्रयन्त करूया असं शरद पवार म्हणाले. या देशात राजे अनेक होऊन गेले. त्याचा इतिहास देखील आहे.
Talathi bharti 2023 online form date ; syllabus
पण आज तीनशे-साडेतीनशे वर्ष झाल्यानंतर देखील देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही एक साधा प्रश्न विचारला की सर्वसमान्य माणसांच्या अंतःकरणात तीनशे-साडेतिनशे वर्ष राहिलेला राजा कोण? तर आसाम असो किंवा केरळ एकच नाव येतं ते शिव छत्रपतींचं. कारण त्यांनी राज्य हे कधीही स्वतःसाठी चालवलं नाही, असेही शरद पवार म्हणाले.
आजवर या देशात अनेक राजे होऊन गेले, देवगिरीचे यादव, दिल्लीचे मुघल, आदिलशाह होऊन गेले. अशी अनेकांची नावे सांगता येतील ज्यांनी राज्य केलं. पण त्यांचं राज्य त्यांच्या घराण्याच्या नावाने चाललं. याला एकच अपवाद शिवछत्रपतींचा होता. त्यांनी कधी भोसल्यांचं राज्य केलं नाही. तर त्यांनी उभं केलं ते हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य. राज्य चालवायचं ते रयतेसाठी चालवायचं, हा आदर्श त्यांनी देशासमोर घालून दिला असेही शरद पवारांनी यावेळी सांगितलं
आज आदर्श राजाच्या सत्ताग्रहनाचा सोहळा लाल महालात होतोय याला एक इतिहास आहे असेही शरद पवार म्हणाले.