भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (17 मे) पहाटे तौक्ते दीवपासून 260 किलोमीटर अंतरावर होतं. तौक्ते मंगळवारी (18 मे) गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी सांगितलं की, चक्रीवादळामुळे 17 आणि 18 मे रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकताना हवेचा वेग प्रतितास 145 किलोमीटर ते 155-165 किलोमीटर राहील, अशी शक्यता आहे.(Tauktae Cyclone| Orange Alert Issued Storm travels towards Mumbai and towards Gujarat)
मुंबईसह ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट
मुंबईतील दादर, वरळी, लोअर परेल, माटुंगा, माहिमसह पश्चिम उपनगरात सर्वत्र जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईतील वरळी सी फेस, शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटा उसळताना पाहायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरात गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या काही काळात मुंबईतील पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. सध्या तौत्के चक्रीवादळ हे मुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.(Tauktae Cyclone| Orange Alert Issued Storm travels towards Mumbai and towards Gujarat)
मुंबईत आज 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तौत्के चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने सध्या त्याचा प्रभाव सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईत सध्या वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघरसह इतर आजूबाजूच्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
[…] […]