Thursday, June 13, 2024

Sanjay Raut| ही राजकीय भूकंपाची सुरूवात; संजय राऊत सूचक वक्तव्य

- Advertisement -

भाजपचे बडे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केल होत. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यावर आज राहुल नार्वेकर आजारी पडले हा राजकीय भूकंप असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना टोला लगावला आहे. शिवसेना अमदार अपात्रता प्रकरणावरून संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल 10 जानेवारीला आहे. तर राहुल नार्वेकर आजारी पडले आहेत, ही राजकीय भूकंपाची सुरुवात आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी केलेल्या सूचक वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान जानेवारी महिन्यात राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी असं वक्तव्य करत पलटवार केला.

महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा मोठा राजकीय भूकंप होणार? |Girish Mahajan

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाला अवघे तीन शिल्लक असताना राहुल नार्वेकर आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यावरून विरोधकांनी राहुल नार्वेकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त बैठक झाली याचवेळी राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानात दुसरीकडे पडद्यामागच्या घडामोडींनी वेग पकडला आहे. गेल्या दीड वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये फूट पडली आहे. या पक्षांनंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात फूट पडेल, अशी भाकीतं सातत्याने वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वातील एक मोठा गट काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपात येईल, अशा चर्चा सातत्याने होत असतात. पण अशोक चव्हाण यांनी या विषयीचे सातत्याने खंडन केलं आहे. असं असताना आता गिरीश महाजन यांनी येत्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रात तिसरा राजकीय भूकंप घडेल, असे संकेत दिले आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाची प्रतिक्षा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला लागलेली आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाला अवघे तीन शिल्लक असताना राहुल नार्वेकर आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. राहुल नार्वेकर हे वर्षावर दाखल होत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे येत्या दोन दिवसात राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles