उत्तर प्रदेशात २०२६ पर्यंत जन्मदर २.१ टक्के करण्याचं लक्ष्य -योगी आदित्यनाथांनी जाहीर केलं लोकसंख्या धोरण

Live Janmat

आज जागतिक लोकसंख्या दिवसाचं औचित्य साधत आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात लोकसंख्या धोरण जाहीर केलं आहे. या पार्श्वभूमीवर ट्विट देखील केलं असून, ”वाढती लोकसंख्या समाजात पसरलेल्या असमानतेसह प्रमुख समस्यांचं मूळ आहे. प्रगत समाज निर्मितीसाठी लोकसंख्या नियंत्रण ही प्राथमिक अट आहे. आज जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आपण वाढत्या लोकसंख्येमुळे वाढत असलेल्या समस्यांबाबत स्वतः व समाजाला जागरूक करण्याची शपथ घेऊयात.” असं ट्विटद्वारे त्यांनी आवाहन केलं आहे.Uttar Pradesh targets 2.1 per cent birth rate by 2026 – Yogi Adityanath announces population policy

राज्याच्या लोकसंख्या धोरण २०२१-३१ चं जाहीर करताना उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, लोकसंख्या धोरण जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे. वाढती लोकसंख्या ही विकासाच्या मार्गात अडथळा बनू शकते. या लोकसंख्या धोरणामध्ये प्रत्येक समाजाचा विचार केला गेला आहे.

या नव्या लोकसंख्या नियंत्रण धोरणानुसार उत्तर प्रदेशात २०२६ पर्यंत जन्मदर २.१ टक्के करण्याचं लक्ष्य आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशात जन्मदर आता २.७ टक्के इतका आहे. हा आकडेवारी राष्ट्रीय जन्मदराच्या २.२ टक्क्यांहून अधिक असल्याचं समोर आलं आहे. तर २०३० पर्यंत जन्मदर १.९ टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न असणार आहे. यासाठी कुटुंब नियोजन आणि आरोग्य सुविधांवर भर दिला जाणार आहे. आरोग्य सुविधांमुळे बालमृत्यू आणि मातृ मृत्यू दर कमी करण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here