Saturday, July 27, 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana) काय आहे?

- Advertisement -

भारतात विविध जाती आणि धर्माचे लोक राहतात, त्यापैकी विशिष्ट समाजाचे लोक काही प्रकारच्या पारंपरिक व्यवसायात गुंतलेले असतात. अशाच प्रकारचा एक समाज आपल्या देशात आहे तो म्हणजे विश्वकर्मा समाज. या विश्वकर्मा समाजातील लोक विविध पारंपरिक व्यवसायायत गुंतलेले आहेत अशा लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्याच अनुषंगाने देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा समाजाच्या कल्याणासाठी उपयुक्ती अशी विश्वकर्मा कौशल सन्मान योजना (PM Vishwakarma Yojana) नुकतीच सुरु केली आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana) ही एक लोकप्रिय योजना आहे. निर्मला सीतारामन यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. ही योजना आणण्याचा मुख्य उद्येश देशातील
पारंपारिक कलाकार आणि कारागिरांना लाभ मिळवून देणे हा आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana) | Highlights

योजनेचे नावपीएम विश्वकर्मा कौशल सम्मान योजना
योजनेची घोषणा कुणी केलीअर्थमंत्री निर्मला सीतारामन
कधी जाहीर केले2023-24 च्या अर्थसंकल्पात
योजना लाँच कधी झाली17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी
उद्दिष्टविश्वकर्मा समाजातील लोकांना प्रशिक्षण आणि निधी प्रदान करणे
लाभार्थीविश्वकर्मा समाजातील जाती
अधिकृत संकेतस्थळhttps://pmvishwakarma.gov.in/
टोल फ्री नंबर18002677777 and 17923


प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची उद्दिष्टे | Objectives of PM Vishwakarma Yojana

  • देशातील पारंपारिक कारागीर आणि कलाकारांना सरकारद्वारे उत्पादन वाढविण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे.
  • प्रधानमंत्री विश्वकर्मा (PM Vishwakarma Yojana) योजनेंतर्गत आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार असून ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना सरकारकडून पैसे दिले जाणार आहेत.
  • पारंपारिक कौशल्ये जतन होण्यास मदत होईल, असंघटीत क्षेत्रातील लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम मदत होईल आणि देशातील रोजगार निर्मितीला चालना मिळेल.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे फायदे | Benefits of PM Vishwakarma Yojana

  • ही योजना पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यास मदत करेल. या योजनेत लोकांना केवळ कर्जच मिळणार नाही तर कौशल्य प्रशिक्षणही मिळणार आहे. या योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ५% व्याज दराने मिळणार आहे.
  • पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. यानंतर व्यवसाय विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
  • प्रधानमंत्री विश्वकर्मा (PM Vishwakarma Yojana) योजनेंतर्गत कारागिरांना त्यांच्या कामाचे प्रशिक्षणही दिले जाणार असून, ज्यांना स्वतःचा रोजगार सुरू करायचा आहे, त्यांना सरकार आर्थिक मदतही करेल.
  • या योजनेमुळे विश्वकर्मा समुदायातील लोकांमध्ये रोजगाराचे प्रमाण वाढून बेरोजगारीचे प्रमाण कमी होणार आहे.

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी | Beneficiaries of Pradhan Mantri Vishwakarma Yojana

सुतार, सोनार, शिल्पकार आणि कुंभार या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पीएम विश्वकर्मा योजनेचा (PM Vishwakarma Yojana) लाभ मिळणार आहे. याद्वारे कारागिरांच्या उत्पादनांचा आणि सेवांचा दर्जा वाढविण्याचा तसेच त्यांना देशांतर्गत बाजारपेठ आणि जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी म्हटले होते की, कारागीर हे स्वतंत्र आणि आत्मनिर्भर भारताच्या खऱ्या भावनेचे प्रतिनिधित्व करतात आणि या योजनेचा फायदा महिला आणि समाजातील दुर्बल घटकांना होईल, जेणेकरून ते स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होतील.

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची पात्रता | Eligibility of Pradhan Mantri Vishwakarma Yojana

  • भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या 18 व्यवसायांपैकी कोणत्याही एकाशी संबंधित असणे आवश्यक आहे.
  • वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी आवश्कायक कागदपत्रे | Required documents for Pradhan Mantri Vishwakarma Yojana

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • फोन नंबर
  • व्यवसाय अनुभव प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles