कौतुकास्पद | कोरोनामुक्ती नंतर बच्चू कडू यांनी केले प्लाझ्मा दान

आतापर्यंत सर्वाधिक वेळा रक्तदान करणारे एकमेव लोकप्रतिनिधी

Live Janmat

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाल्यावर त्याच्या शरीरात अँटी बॉडीज तयार झाल्या. त्यामुळे त्यांनी आज प्लाझा दान करत इतरांनी सुद्धा प्लाझा देण्यासाठी पुढं यावं असं आवाहन त्यांनी केले.

अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्लाझ्मा दान केला आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्लाझ्मा दान केले. राज्यभरात कोरोना रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यूच प्रमाण वाढत आहे. तर प्लाझा अभावी अनेक रुग्णांचा मृत्यूसुद्धा होतोय.  कोरोना रुग्णांना गंभीर परिस्थितीत प्लाझ्माची गरज असते. या पार्श्वभुमीवर राज्य सरकारच्यावतीने प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात येतंय.

लस घेतल्यानंतर रक्तदान करता येणार नाही,त्यामुळे लसीकरणाच्या अगोदर रक्तदान करावे असे युवकांना आवाहन केले. आतापर्यंत तब्बल 100 वेळा रक्तदान केलंय. आता 101 व्या वेळी त्यांनी आपला प्लाझा दान केला आहे. आतापर्यंत सर्वाधिक वेळा रक्तदान करणारे एकमेव लोकप्रतिनिधी बच्चू कडू असल्याचे सांगितलं जातंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here