Monday, September 9, 2024

सतेज पाटील गटाला पुन्हा एकदा धक्का; सुप्रिम कोर्टाने राजारामचे सभासद वैध ठरवले

- Advertisement -

राजाराम कारखान्याच्या Rajaram Factory १८९९ सभासदांनी त्यांच्या सभासदत्वाचा लढा सुप्रिम कोर्टामध्ये अखेर जिंकलाच. त्यांच्या सभासदत्वा विषयी  प्रादेशिक सहसंचालक (साखर), तत्कालिन सहकार मंत्री व हायकोर्टाने दिलेले अपात्रतेचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड व न्या. पी. नरसिंह यांच्या खंडपीठाने रद्दबातल ठरवले. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी आमदार अमल महाडिक यांनी “सभासदांचे सर्व हक्क अबाधित ठेवले.  त्यांना न्याय दिला” अशी  भावना व्यक्त केली.

देशामध्ये न्याय व्यवस्था सर्वोच्च असून न्याय देवतेने राजाराम कारखान्याच्या या सभासदांना तसेच कारखान्याच्या व्यवस्थापनास देखील पुरेपूर न्याय दिला. याबद्दल आम्ही सर्व सभासदांचे वतीने  सर्वोच्च न्यायालयाचे ऋणी आहोत असे आमल महाडिक यांनी म्हटले आहे. Rajaram Factory

pm kisan | मोठी बातमी, ‘या’ दिवशी जमा होणार १३ व्या हप्त्याची रक्कम

Shivaji University Phd|अभाविप कडून छगन भुजबळांच्या जाहीर निषेध

महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन: येथे अर्ज करा.

 महाडिक यांनी म्हटले आहे,” विरोधकांनी कारखान्याच्या स्थापनेपासून सभासद असणाऱ्या तसेच आणि कारखान्याच्या नियमाप्रमाणे सभासदत्व धारण केलेल्या १८९९ सभासदांच्या बाबतीत चुकीची कागदपत्रे सादर करून तत्कालिन पालकमंत्र्यांनी पदाचा गैरवापर करून शासकीय यंत्रणा व तत्कालिन सहकार मंत्री यांना हाताशी धरून या सभासदांना अपात्र ठरविण्याचा  प्रयत्न केला होता. परंतू “भगवान के घर देर है अंधेर नहीं” याची सर्वोच्च न्यायालयाने प्रचिती देऊन तत्कालिन पालक मंत्र्यांनी दबाब तंत्राने घ्यायला लावलेले हे चुकीचे सर्व निर्णय फटकारून लावले. विरोधकांना या बसलेल्या जबरदस्त चपराकीने आता तरी ते शहाणे होतील का ?”

राजाराम कारखान्याचा कारभार मा. आ. महादेवरावजी महाडिक यांच्या कुशल नेतृत्वाखाली पारदर्शीपणे सुरू आहे. मात्र विरोधासाठी विरोध आणि केवळ सोयीचे राजकारण एवढेच ध्येय मनात ठेऊन निष्कारण गोरगरीब सभासदांना अपात्र ठरवून त्यांच्या तोंडचा लाभाचा घास काढून घेण्याचा कुटील डाव अखेर सभासदांच्या न्याय मागणीने हाणून पाडला. दंडुकशाहीच्या जोरावर छोट्या मोठ्या लढाया जिंकता येतात पण महायुध्द जिंकण्यासाठी संयमाची आवश्यकता असते. आणि त्यामुळेच भविष्यात आमच्या विजयाचा वारू कोणीही रोखू शकणार नाही. याची जाणीव विरोधकांनी ठेवावी असा टोला महाडिक यांनी लगावला. Rajaram Factory

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles