अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोल्हापूर कडून शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य द्वारासमोर छगन भुजबळ यांनी पीएचडी (Shivaji University Phd) करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
महाराष्ट्रचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू होते, यावेळी चर्चेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते छगन भुजबळ यांनी ‘पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती ही उधळपट्टी आहे’, सोबत PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना “साले PHD वाले” असे म्हटले. या वक्तव्याचा अभाविप कोल्हापूर शाखेकडून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी बोलतांना कोल्हापूर महानगर मंत्री दिग्विजय गरड म्हणाले की “या नीच राजकीय वृत्तीचा अभाविप जाहीर निषेध करते, जे राजकीय नेते स्वतः ला पुरोगामी म्हणवून घेतात, आम्ही फुले,शाहू, आंबेडकरांचा वारसा चालवतो असे म्हणत छाती बडवतात. तेच या प्रकारचं घाणेरडं वक्तव्य करतात यातून त्यांची नीच राजकीय विचारधारा समाजासमोर आली आहे. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा असा अपमान विद्यार्थी परिषद कदापि सहन करणार नाही.” (Shivaji University Phd)
shivaji university |परीक्षा-आंदोलन हे समीकरण कधी बदलणार?
shivaji university | परीक्षा ऑफलाइन लेखी स्वरूपात सुरू
राज्य विद्यापीठांच्या परीक्षा आणि निकालांच्या वेळापत्रकात एकसमानता आणणार ? | SPPU exam
यावेळी शिवाजी विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांसोबत दीपक नडमने, प्रविण दिगेकर, प्रसाद लष्कर, अथर्व मोहिते, श्रावण शेंडे, अदनान इनामदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
- IND vs AUS | India vs Australia WTC Final 2023 LIVE
- विद्यार्थी पटसंखेनुसार संच मान्यता करून एकाच टप्प्यात 100% शिक्षकांची पदभरती करा
- चला समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा…|rural development plan
- PMMVY | प्रधानमंत्री मातृवंदना योजना नव्या स्वरूपात लागू
- मोठी बातमी | शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार, आयुक्तांचे एसीबीला पत्र