Saturday, July 27, 2024

2185 विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्या – मराठा विद्यार्थ्यांची हॅशटॅग मोहीम

- Advertisement -

9 सप्टेंबर 2020 पर्यंत मराठा आरक्षणानुसार (Maratha Reservation) झालेले वैद्यकीय प्रवेश सर्वोच्च न्यायालयाने वैद्य ठेवलेले आहेत. एमपीएससी मधून निवड झालेल्या 413 उमेदवारांच्या निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. फक्त कोरोनाच्या कारणास्तव त्यांना नियुक्ती पत्रक दिले गेले नव्हते. त्यामुळे या उमेदवारांना तत्काळ सेवेमध्ये रुजू करण्यात यावे अशी मागणी होत आहे. (Maratha Reservation | appoint Maratha 2185 students) यासाठी काल विद्यार्थ्यानी
#SEBCMaratha_Joining
मोहीम चालवली.

राज्यसेवा मुख्य परीक्षेची जाहिरात, पुर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, अंतिम निकाल आणि शिफारस हे सर्व टप्पे मराठा आरक्षण कायदा अंमलात असताना पुर्ण झाले आहेत. याचप्रमाणे विविध विभागांच्या भरतीप्रक्रियाही 9 सप्टेंबर 2020 पुर्वीच पुर्ण झाल्या आहेत परंतू शासनाने कोव्हिडच्या कारणास्तव नियुक्ती पत्रक दिले नव्हते.

कोव्हिडच्या कारणामुळे राज्यसेवा मुख्य परीत्रक्षेचा अंतिम निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उशीरा जाहीर केला. तरीही खरंतर या नियुक्त्या ऑगष्टमध्येच होणे अपेक्षित होते परंतू शासनाने कोव्हिडच्या कारणास्तव आम्हाला थांबवून ठेवले होते. दुसऱ्या बाजूला शासनाने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण खटल्यामध्ये वित्त विभागाचा 4 मे 2020 चा एक शासननिर्णय(GR) सादर केला होता ज्यानुसार शासनाने कोव्हिडच्या कारणास्तव काही विभाग वगळता नव्या शासकीय नोकरभरतीवर तात्पुरती बंदी घातली होती. हा शासननिर्णय शासनाने न्यायालयात सादर करून आम्ही कुठलीही नवी नोकरभरती करणार नाही असे आश्वासन न्यायालयात दिले परंतू त्याचवेळी सुरू असलेल्या नोकरभरतीचा तपशील मात्र शासनाने न्यायालयात सादर केला नाही. (Maratha Reservation | appoint Maratha 2185 students)

नोकर भरतीच्या update साठी तुमचा Email Subscribe करा.

खरंतर हा तपशील तेव्हाच न्यायालयासमोर मांडला असता तर आज वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशांप्रमाणेच आमच्या प्रक्रियेलाही सर्वोच्च न्यायालयाने संरक्षित केले असते. या सगळ्यात उमेदवारांची काहीही चुक नसताना सर्व उमेदवार नाहक भरडले जात आहेत. याशिवाय दि. 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय संविधान पीठाने दिलेल्या अंतिम निकालामध्ये दि. 9 सप्टेंबर 2020 पूर्वी पुर्ण झालेले सर्व शैक्षणिक प्रवेश आणि भरती प्रक्रिया ह्या अबाधित राहतील असा स्पष्ट उल्लेख केला आहे. तेव्हा त्याआधारे आता कुठलाही विलंब न करता राज्यसेवा परीक्षेसह सर्व विभागांतील भरतीप्रक्रियांतील अंतिम निवड यादीतील उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात अशी मागणी मराठा विद्यार्थी परिषदने केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles