Friday, April 19, 2024

gramsevak bharti |ग्रामसेवकभरतीचे ‘या’ दिवशी जाहीरहोणार वेळापत्रक

- Advertisement -

लवकरच महाराष्ट्रात ग्रामसेवकांची मेगा भरती होणार आहे. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट- ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यात येणार आहे. सदर मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार दि. १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत लागू राहील. त्यापुढील gramsevak bharti 2021 भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या शासन निर्णय दि. ३० सप्टेंबर, २०२२ नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येणार आहे. ग्रामविकास विभागाअंतर्गत ग्रामसेवकांची मेगा भरती

ZP Exam | ऑनलाइन परीक्षा वेळेत होणे शक्य नाहीच!

MPSC Mains | सरकारच्या नाकर्तेपणामुळे उमेदवारांवर पुनःश्च आंदोलनाची वेळ

talathi bharti 2022 | तलाठी परीक्षेसाठीचा नवीन अभ्यासक्रम जाणून घ्या

जिल्हा परिषदांतील गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक देण्यात आले आहे. १ ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर पुढे २२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील. २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ दरम्यान अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. तर २ ते ५ मार्च २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. gramsevak bharti 2021

६ ते १३ एप्रिल २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर १४ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. gramsevak bharti 2021

१ मे ते ३१ मे या कालावधीत अंतिम निकाल आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले जाणार आहेत. या वेळापत्रकाचे सर्व जिल्हा परिषदांना पालन करावे लागणार आहे. त्याकरिता रिक्त पदे (एकूण रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत), त्यांची आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची असेल.

Mahadbt Scholarship |विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती; येथे अर्ज करा

ग्रामसेवकाची कार्ये | gramsevak bharti 2021

  • ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळणे.
  • गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादींची नोंद ठेवणे.
  • पाणीपट्टी, घरपट्टी इत्यादी करांची वसूली करणे.
  • ग्रामपंचायतीच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे.
  • ग्रामपंचायतीच्या सभा व ग्रामसभांना उपस्थित राहून इतिवृत्त लिहिणे.
  • विस्तार अधिकाऱ्याच्या सल्ल्यावरून ग्रामसेवक गावात इतर योजनांची माहिती देतो व अंमलबजावणी करतो.
  • ग्रामपंचायत हद्दीतील जमिन, रस्ते, इमारती, पडसर जागा, व इतर सार्वजनिक जागा यांच्या मोजमापाचे अभिलेख अद्यावत ठेवणे व ग्रामदर्शक नकाशा ग्रामपंचायतीमध्ये ठेवणे.
  • ग्रामपंचायत ही नियमांची व कायद्यांची उलंघन करणारी कृती करीत असेल किंवा तसे करावयाचे ठरविले असल्यास त्याबाबत अहवाल मुख्य कार्यकारी अधिकरी / गट विकास अधिकारी यांना विहीत मुदतीत सादर करणे.
  • ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील कर्मचा-यांवर नियंत्रण व त्यांकची आस्थाणपना विषयक बाबी उदा. सेवापुस्तकक, वैयक्तीाक नस्या्या परिपूर्ण ठेवणे,भविष्य् निर्वाह निधी, बोनस इ. शासनाच्याा आदेशानुसार व नियमानुसार देणे.

शासकीय नोकरभरतीच्या बातम्यांसाठी Email Subscribe करा.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles