पुणे : ”महाराष्ट्र केसरी”(Maharashtra Kesari 2023) ही कुस्तीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मनाली जाते. या महिन्यातील १० ते १४ तारखेपासून पुण्यात कुस्ती शौकिंनासाठी पर्वणी असणार आहे. महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2023) स्पर्धा भरविण्यावरून सुरू असणार्या वादंगार पडदा पडला असल्याची माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडप व महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे मुख्य संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. या स्पर्धेत विजेत्यास बुलढाणा बँकेकडून पाच लाख तर उपविजेत्यास अडीच लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीचे चेअरमन संजय कुमार सिंह, जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे,पुणे शहर तालिम संघाचे विश्वस्त पै. तात्यासाहेब भिंताडे, शहर राष्ट्रीय तालिम संघाचे अध्यक्ष पै. योगेश दोडके, पिंपरी- चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. हनुमंत गावडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथूरे आणि पदाधिकारी आदि उपस्थित होते.
- अमित शाह यांचा मुंबई दौरा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा ठरणार का ?
- मराठा कार्यकर्त्यांने मनोज जरांगेना कोड्यात टाकले ?
- कोल्हापूर-गोवा विमानसेवा सुरु: खासदार धनंजय महाडिकांच्या पाठपुराव्याने |
- महाराष्ट्रात होणार तिसरी आघाडी, महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकत्र|
- सचिन खिलारीचा पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदकाला गवसणी |