पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली. (NCP’s letter to Election Commission for re-election of Pandharpur by-election)
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे कमळ पंढरीत फुलले आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडेंनी 3733 मतांनी बाजी मारली. दिवंगत भारत भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke,NCP) यांचा आवताडेंनी पराभव केला.
दरम्यान साम-दाम-दंड-भेद वापरून ही निवडणूक पार पडली असून त्याची योग्य ती चौकशी करून फेरनिवडणूक पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलने केली आहे. नुकतंच त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लीगल सेलचे अॅड नितीन माने यांनी याबाबतची मागणी केली आहे. (NCP’s letter to Election Commission for re-election of Pandharpur by-election)
निवडणुकीपूर्वी समाधान आवताडे (Samadhan autade, BJP) यांच्या कारखान्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि सभासदांना निवडणुकीपूर्वी तीन दिवस डांबून ठेवलं आणि भाजपला मतदान करा, नाहीतर कामावरून काढून टाकू, असं सांगण्यात आलं. असा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आला आहे. त्याबरोबरच प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांचे फोन रेकॉर्डिंग तपासावे आणि माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या निवडणुकीची चौकशी करावी, असं देखील या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
सरकार वन प्रशासन झोपले होते का त्यावेळी
सरकार व प्रशासन काय झोपले होते का तेव्हा?