Friday, September 13, 2024

Pan card|…..तर पॅन कार्ड बंद होणार

- Advertisement -

भारत सरकारकडून वेळोवेळी अधिसूचना जारी करून सरकारी कागदपत्रे एकमेकांना जोडण्यास सांगण्यात येत असतात.पॅन कार्ड आधार कार्ड शी जोडण्याबाबत पुरेसा वेळ देऊन देखील बर्‍याच नागरिकांनी अजूनही आधार पॅनशी लिंक केलेलं नाही , म्हणून जर तुमचं पॅन कार्ड वैध आधार कार्ड सोबत लिंक केलेलं नसेल तर १ एप्रिल 2023 पासून तुमच पॅन कार्ड निष्क्रिय होईल. 

आजच पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करून घ्या.

पॅनकार्ड ( pan card) आणि आधारकार्ड हे महत्त्वपूर्ण दस्ताऐवज आहे. पॅनकार्ड हे आर्थिक व्यवहारांसाठी उपयुक्त आहे. तर आधारकार्ड ही त्या व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा आहे. पॅनकार्डच्या मदतीने आयकर भरता येतो. पॅनकार्डवर 10-अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक असतो. कर चुकवेगिरी टाळण्यासाठी हा नंबर महत्त्वाचा असतो. 1 जानेवारी 2005 पासून कोणत्याही चलनासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. पॅन नंबरद्वारे विशिष्ट व्यक्ती किंवा संस्थेद्वारे केलेल्या आर्थिक व्यवहारांची नोंद केली जाते. पॅन कार्ड खाते उघडण्यासाठी, रोख रक्कम जमा करण्यासाठी, आर्थिक व्यवहार करण्यासाठी हे एक अतिशय महत्त्वाचे ओळखपत्र आहे.

hindkesari 2023| अभिजीत कटके हिंद केसरी; पटकावली मानाची गदा!

Common Entrance Test| MHT CET परीक्षांचे वेळापत्रक जारी

urfi javed|उर्फी जावेद चित्रा वाघ यांच्यावर भडकली

gramsevak bharti |ग्रामसेवकभरतीचे ‘या’ दिवशी जाहीरहोणार वेळापत्रक

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने 30 जून 2022 पासून पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी 1000 रुपये विलंब शुल्क आकारत आहे. प्राप्तिकर विभागाने सांगितले की, प्राप्तिकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅन धारकांसाठी, जे सवलत श्रेणीत येत नाहीत. त्यांना आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्ज 2023 आहे. जर पॅन आधारशी लिंक नसेल तर पॅन निष्क्रिय होईल.

 याशिवाय तुम्ही तुमचे बंद पॅन कार्ड कागदपत्र म्हणून कुठेही वापरत असाल तर तुम्हाला दंडही होऊ शकतो. आयकर कायदा १९६१ च्या कलम २७२B अंतर्गत तुम्हाला १० हजारांपर्यंत दंड देखील भरावा लागू शकतो असे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. यासाठी तुम्हाला http://www.incometax.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे जाऊन तुम्ही तुमचे पॅन कार्ड (pan card) आधार कार्डशी लिंक करू शकता. वेळ न घालवता आजच पॅन आधार कार्ड शी लिंक करून घ्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

2,356FansLike
2,369FollowersFollow
76,700SubscribersSubscribe

Latest Articles