मुंबई :- आपल्या हटके कपड्यांवरून नेहमीच ऊर्फी जावेद (urfi javed) सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. कमी कपड्यांवरून ती वारंवार ट्रोल होत असते, मात्र यावेळी भारतीय महिला मोर्चा, महाराष्ट्र च्या प्रदेशाध्यक्षा चित्रा किशोर वाघ यांनी पोलिस स्टेशन मध्ये उर्फी जावेद विरोधात रीतसर तक्रार नोंदवली. अन् आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले.
या संपूर्ण प्रकरणावर उर्फी जावेद(urfi javed) हिने आपले मौन सोडले. अन् आक्रमक पवित्रा घेतला. इंस्टाग्राम वर पोस्ट लिहित चित्रा वाघ यांचा खरपूस समाचार घेतला आहे. कांजवाला प्रकरणाचा उल्लेख करत, त्या प्रकरणातील पीडित महिलेच्या आईचा व्हिडिओ पोस्ट करत चित्रा वाघ आणि भाजप यांच्यावर निशाणा साधला.
MPSC Mains | सरकारच्या नाकर्तेपणामुळे उमेदवारांवर पुनःश्च आंदोलनाची वेळ
gramsevak bharti |ग्रामसेवकभरतीचे ‘या’ दिवशी जाहीरहोणार वेळापत्रक
ZP Exam | ऑनलाइन परीक्षा वेळेत होणे शक्य नाहीच!
यापूर्वी चित्रा वाघ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सक्रिय राजकारणात होत्या. तत्कालीन शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्यावर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. यामुळे संजय राठोड यांचे मंत्रीपद गेले होते. “परंतु भाजप प्रवेशानंतर त्यांची अन् तुमची चांगली मैत्री झाली.” अशा खोचक शब्दात ट्विट करत उर्फी जावेदने चित्रा वाघ अन् पर्यायाने भाजप विरोधात आघाडी उघडली आहे. विविध गंभीर आरोप असणाऱ्या नेत्यांना भाजपा पाठीशी घालत असल्याचेही तीने या ठिकाणी नमूद केले आहे. त्यामुळे उर्फी जावेद प्रकरण चित्रा वाघ यांच्यावर उलटनार अशी परस्थिती निर्माण झाली आहे.
- हातकणंगले लोकसभा आवाडे कुटुंबीयांची तयारी सुरू पण पक्ष दिल तो निर्णय – मंत्री चंद्रकांतदादा पाटील
- कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन
- भालचंद्र चिकोडे ग्रंथालयआयोजित “पुस्तकांवर बोलू काही”चे पहिले सत्र संपन्न
- भालचंद्र चिकोडे ग्रंथालयामार्फत अनोखा उपक्रम “पुस्तकांवर बोलू काही”
- BJP Poster Maker App for Festival Banners, Birthday Wishes, and Election Posters