Crocodile in Kasari river|….. तो व्हिडिओ व्हायरल

Crocodile in Kasari river

पोर्ले: येथील कासारी नदीतील मगरीचा (Crocodile in Kasari river) व्हिडिओ सध्या समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल होतोय. व्हायरल होण्यापाठीमागे कारण देखील तसेच आहे. मागील वर्षात मगर आणि लाकूड यांच्यावरील व्हिडिओने धुमाकूळ घातला होता. अन एखाद्या मॉडेलने पोज द्यावी अशी मगर लाकडावर येऊन बसली. इथ मात्र पाहणार्‍यांना मगर हाय रे ती… नाय लाकूड हाय रे ते… असे म्हणण्याचे धाडस मात्र झाले नाही. धाडसी युवकांनी या मगरीचे व्हिडिओ (Crocodile in Kasari river) बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे एकीकडे भीतीचे वातावरण तर दुसरीकडे हलक्या फुलक्या मिम्सने वातावरण ऐन थंडीत चांगलेच तापवले. गावातील जेष्ठ नागरिकांची मात्र लहान-थोर मुलांवर चांगलीच करडी नजर आहे. नदीवर कोणीही जाणार नाहीत याची काळजी घेतली जाते. स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिक याचे काटेकोर पालन करतील अशी आशा आहे.

urfi javed | ‘हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही’ उर्फी जावेदविरोधात चित्रा वाघ आक्रमक;

Mahadbt Scholarship |विद्यार्थ्यांना मिळणार 50 हजार रुपयांची शिष्यवृत्ती; येथे अर्ज करा

maharashtra kesari | पुण्यात होणार महाराष्ट्र केसरीचा थरार

vishal  के बारे में
vishal The live janmat is a Marathi digital News web portal. We aim to report the latest news, views, and entertainment. We seek to look at policies and decision-making from the perspective of people. Read More
For Feedback - livejanmt@gmail.com